पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२०ऑक्टोबर
जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पड़ावी आणि कायदा व सुव्यवस्था टिकून राहावा यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुन्हेगारांचर शापं वाँच ठेवण्याची तयारी झाली असून, गेल्या दहा महिन्यांत ४६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३५ पिस्तूल आणि १२६ जणांकडून कोयता, तलवार, सत्तूर, चाकू अशी शस्त्रे जप्त केली आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत १६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आता निवडणुकीच्या अनुषगनि पोलिस आणखी गुन्हेगारांची जंत्री जमवीत आहेत. जिल्ह्यातील निवडणुकांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता अनेक अनुचित घटना निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर घडल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल प्रयत्नशील आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि डिस्ट्रीशिटर यांची जंत्री जमविण्याचे काम पोलिस दलाकडून सुरू आहे. दुसरीकडे आतापर्यंत विविध गुन्ह्यांतील १६२ सराईत आरोपीना जिल्हा पोलिस दलाने हदपार केले आहे. त्यात सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या व दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून प्रत्येक पोलिस ठाणे व उपविभागीय कार्यालयाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची दहशत आहे, निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू शकतो का, याची गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे १७ हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, १८ जणांविरुद्ध एमपीडीए' नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस ठाणेनिहाय हद्दपारांची संख्या
तोफखाना १४, कोतवाली १४, भिंगार १४, एमआयडीसी ४, नगर तालुका ५, सुपा १, सिडी १०, कोगरगाव शहर २, कोपरगाव तालुका ७, लोणी ४. राहाता ३. श्रीरामपूर शहर २४. श्रीरामपूर तालुका २. राहुरी १९, जामखेड ७, कर्जत २, बेलवंडी २, मिरजगाव १, खर्डा १, श्रीगोंदा ३, सोनई पार्टी ७. शेवगाव ३, नेवासा ५, संगमनेर शहर ६, संगमनेर तालुका ६
चौकट
राकेश ओला, पोलिस अधीक्षक निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रयत्नशील आहेत. परंतु, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
No comments:
Post a Comment