पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर मुलीचा मृतदेह विहरीत आढळून आला असता, तपासाअंती प्रेम प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खर्डा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून गुन्हातील आरोपी सुभाष लक्ष्मण लटके यास पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन अटक केली आहे, या घटनेने सातेफळ गावात खळबळ उडाली आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खर्डा हद्दीतील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा खर्डा पोलीस स्टेशनला चार दिवसांपूर्वी दाखल झाला होता त्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .पोलिसांनी तपासात सदरची मुलगी ही गावातील एका माणसाकडून मोबाईल घेऊन तिने फोन लावला होता,त्यानंतर ती शेताकडे गेल्याचे सांगितले गेले त्यानंतर पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलाच्या मदतीने अनेक विहिरी तपासल्या असता एका विहिरी जवळ तिचा सॅंडल व ओढणी मिळून आल्याने स्थानिकांच्या मदतीने चार तासांच्या प्रयत्नानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सदर मृतदेह पोस्टमार्टम साठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर खर्डा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली असता आरोपी सुभाष लक्ष्मण लटके वय २२ वर्षे राहणार सातेफळ यास BNS 1074 ,64,64(2),(M),351,(2),(M),351,(2)351,(3) पोस्को अंतर्गत गुन्ह्यात तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्ह्याचा खरा छडा लागणार आहे.
सदरील घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment