संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर, दुसरा टप्पा 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
Tuesday, October 15, 2024
Home
सामाजिक बातम्या
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 ला निकाल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 ला निकाल
Tags
# सामाजिक बातम्या
About Unknown
सामाजिक बातम्या
Labels
सामाजिक बातम्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
No comments:
Post a Comment