जामखेड प्रतिनीधी/३०सप्टेंबर२०२५
जामखेड शहरातील अनाधिकृत बॅनरवर जामखेड नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध बॅनर काढून टाकले. या मोहिमेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मोहिमेचे नेतृत्व केले. शहराचे विद्रूपीकरण करणारे व विनापरवाना लावलेले बॅनर हटविण्याच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले.मुख्याधिकारी अजय साळवे यांनी स्पष्ट केले की, जामखेडसह राज्यभरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवाना लावण्यात आलेले कोणतेही बॅनर मान्य नाहीत. त्यामुळे परवानगीशिवाय बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे शहरातील सर्व व्यक्तींनी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच बॅनर लावावेत, अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, वर्षा जाधव, कार्यालयाध्यक्ष संभाजी कोकाटे, अभियंता अमीर शेख यांच्यासह अनेक नगरपरिषद कर्मचारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा