पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१४ ऑक्टोबर
भाजपा नेते आमदार प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक बाळगव्हाण येथील युवा मोर्चा जामखेड तालुका उपाध्यक्ष सागर सोनवणे यांनी आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात एक अनोखी संकल्पना करत सामजिक उपक्रम राबविला आहे त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांचा फोटो असणारा रायटिंग पॅड जामखेड तालुक्यातील
बाळगव्हाण,लोणी ,वाकी ,आनंदवाडी, बांधखडक ,नागोबाचिवाडी, सतेवाडी, डोळेवाडी या जिल्हा परिषद शाळेत सागर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना 1,000 रायटिंग पॅड वाटप केले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपा तालुका उपाध्यक्ष सागर सोनवणे यांनी आपली संकल्पना सांगितली ते म्हणाले आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपल्या ग्रामीण भागातील एक उमदनेतृत्व असणारे आमदार राम शिंदे हे विद्यार्थ्यांसाठी एक आयडॉल बनू शकतात कारण राम शिंदे यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचे राज्यमंत्रीपदापर्यंतची वाटचाल थक्क करणारे आहे. गावचे सरपंच ते राज्याचा मंत्रिमंडळात त्यांनी मजल मारली आहे. राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्यावर राज्यसह मतदारसंघातील विकास कामे करून जनतेचा विश्वास आणखी दृढ करण्याची संधी मिळाली आहे. तसेच सालगड्याचा मुलगा राजकीय संघर्ष आणि कर्जत जामखेडच विकासाभिमुख नेतृत्व आमदार राम शिंदे यांची ओळख आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आज जामखेडतालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार राम शिंदे ह्यांचा फोटो रायटिंग पॅडवर छापून ते ते पॅड विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत.कारण त्यांचा हा राजकिय संघर्ष पाहता मला असे वाटते विद्यार्थ्यांसाठी हा रायटिंग पॅड येणाऱ्या काळात प्रेरणादायी ठरेल व आमदार राम शिंदे एक आयडल ठरू शकतात.
यावेळी सागर सोनवणे, नानासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे,एकनाथ गोपाळघरे, सचिन गोपाळघरे, केशव वनवे, राहुल दाताळ, ऋषिकेश गोपाळघरे, तानाजी फुंदे, काकासाहेब शिकारे, भरत होडशीळसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment