पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/14 ऑक्टोबर
15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थी शिक्षक पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक हात धुवा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
आरोग्याच्या संदर्भात हाताच्या स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुकत्याच दिलेले आव्हानुसार दरवर्षी केवळ अस्वच्छतेमुळे संसर्ग रोगामुळे भारतात लाखो लोक मृत्युमुखी पडतात. तसेच कोविड संसर्गामध्ये स्वच्छतेचे महत्व जाणवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हात धुण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
कलाशिक्षिक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त संसर्गजन्य रोगांची माहिती देऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व हात धुण्याचे प्रात्यक्षिक अतिशय खेळीमेळीच्या वातावर नाविन्यपूर्ण कृतीयुक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्याने नवचैतन्य निर्माण झाले.
दीड हजार विद्यार्थ्यांनी मनोरंजन पद्धतीने हात धुण्याचे प्रशिक्षण घेतले .तसेच रोज हात धुण्याची शपथ विद्यार्थी पालक शिक्षकांनी सर्वांनी घेतली.
तसेच पाचवी ते बारावीच्या वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य संदर्भात दररोज हात धुण्याच्या सूचना दिल्या.यावेळी प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापक हाके सर, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, प्रा विनोद सासवडकर, प्रा कैलास वायकर, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य मडके बी के यांनी विद्यार्थिनी स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखावी व दररोज व्यवस्थित हात धुवावे असे मार्गदर्शन केले. स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी जागतिक हात धुवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांनी आरोग्यदायी जीवन जगावे असे मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment