पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२६ नोव्हेंबर २०२४
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी खर्डा येथे ग्रामिण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र खर्डा च्या माध्यमातून 26 नोव्हेंबर संविधान जागतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन पार पडला. यावेळेस विजय झंजाड म्हणाले की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाचा आत्मा आहे व संविधान दिन प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये , गावामध्ये साजरा करण्यात आला पाहिजे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खर्डा गावचे सरपंच संजीवनी ताई पाटील म्हणाल्या की, प्रत्येक महिलांना सन्मानाची वागणूक देणारं ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे. त्या ह्या कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तानाजी राळेभात यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. बिपिन चंद्र लाड यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक अमर भैसडे यांनीही संविधाना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. संतोष चव्हाण यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच शंभूराजे इंगळे या छोट्या मुलांनेही संविधानावर छान भाषण केले .तसेच सोनम धिवर ताई म्हणाल्या की , संविधान प्रत्येक नागरिकाच्या मना मनात रुजवलं पाहिजे. या कार्यक्रमासाठी संविधान प्रचारक नीता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रस्तावना विशाल पवार यांनी केली. कार्यक्रमाचे आभार मंगल शिंगाणे आणि उर्मिला कवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी भीमराव सूरवसे, गणपत कराळे, रेश्मा बागवान, आशा टेपाळे, सविता खरात, रेखा खटावकर, शालन आरुणे, गोदावरी नाईक, अर्चना जावळे, हुसेन मदारी, फकीर मदारी, इत्यादी उपस्थित होते. तसेच भटके विमुक्तातील लोकांना 30 डोमासाईल, 50 जातीचे दाखले सहाय्यक पोलीस निरीक्षक झंजाड साहेब आणि खर्डा गावचे सरपंच यांच्या हस्ते भटके विमुक्त समाजाला वाटण्यात आले. लवकरच 200 जातीचे दाखले प्रांत साहेब जामखेड चे तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आणि ग्रामीण विकास केंद्र यांच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत. हा संविधान दिन ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र या संस्थेच्या माध्यमातून पार पडला .
No comments:
Post a Comment