पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ नोव्हेंबर२०२४
काल विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला व महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत असा विजय मिळवत महाविकास आघाडीला पुरते चितपट केले. कालचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आतापर्यंत लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा ठरला.
यामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली.
यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना देखील पराभव पत्करावा लागला. या व्यतिरिक्त जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार व भाजप महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली.
तसे पाहायला गेले तर संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी प्रचारांमध्ये देखील चुरस पाहायला मिळाली. भूमिपुत्र विरुद्ध उपरा हा मुद्दा या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने गाजला.
सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजित होणारे प्राध्यापक राम शिंदे हे एक नंबरचे उमेदवार
या सगळ्या अनुषंगाने आपण काल कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी सुरू असताना देखील अखेरच्या क्षणापर्यंत यामध्ये चुरसच पाहायला मिळाली व या चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा निसटता विजय झाला.
जर या निवडणुकीत मताधिक्य बघितले तर ते रोहित पवार यांना एक लाख 27 हजार 676 मते मिळाली तर भाजपा महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 इतके मते मिळाली होती. तर यामध्ये आपण मतांचा फरक बघितला तर तो अवघ्या १२४३ मतांचा इतका आहे व प्राध्यापक राम शिंदे यांचा फक्त 1243 मतांनी पराभव झाला.
ही आकडेवारी बघितली तर राज्यांमध्ये सर्वाधिक मते व सर्वात कमी फरकाने पराजित झालेले क्रमांक एकचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे ठरले व राज्यात सहाव्या क्रमांकावर कमी फरकाने पराजय झालेले उमेदवार देखील राम शिंदेच ठरले. प्राध्यापक राम शिंदे यांनी दिलेली ही लढत पाहिजे तेवढी सोपी नव्हती.तसे पाहायला गेले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच हा एक लढा म्हणावा लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील कारकीर्द बघितली तर ती तब्बल 60 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीची आहे.
या साठ वर्षाच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभव तसेच सत्ता आणि अफाट अशी संपत्ती असणाऱ्या शरद पवारांच्या बलाढ्य ताकदीपुढे एका सालकऱ्याच्या मुलाने दिलेली ही कडवी झुंज ही खरंच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
अटीतटीच्या झालेल्या लढतीत प्राध्यापक राम शंकर शिंदे यांना एक लाख 26 हजार 433 इतके मते मिळाली व अवघ्या 1243 मतांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला.
No comments:
Post a Comment