पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८ डिसेंबर२०२४
शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरू असताना जामखेड तालुक्यातील सोयाबीन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार ०१/१२/२०२४ रोजी फिर्यादी बाळु महादेव गिते, रा. आनंदवाडी, ता. जामखेड यांचे पत्र्याचे शेडमधुन अज्ञात चोरटयांनी ३५ सोयाबीनच्या गोण्या व ५ इंडीयन कंपनीच्या गॅस टाक्या फिर्यादीचे संमतीशिवाय स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेल्या आहे. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गु.र.नं. १९५/२०२४ बीएनएस कलम नुसार ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांनी चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, स्थानिक गुन्हे शाखा पोसई/अनंतर सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, गणेश लोंढे, हृदय घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, रोहित येमुल, रोहित मिसाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, उमाकांत गावडे, अरूण मोरे व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार रईस सय्यद, संभाजी शेंडे, संदीप धामणे, प्रविण थोरात, शशी म्हस्के, आनंद धनवडे, धनराज बिराजदार, राहुल शिंदे, वैजिनाथ मिसाळ, पंडीत हबर्ड व अशोक बडे अशांचे संयुक्त पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
दिनांक १७/१२/२०२४ रोजी तपास पथक खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयातील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे दादासाहेब शामराव शिंदे, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह मांडवा, ता. वाशी येथे आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मांडवा, ता. वाशी येथे संशयीत इसमास शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव १) दादाराव शामराव शिंदे, वय ५० २) अनिल भिमराव शिंदे, वय ५३ ३) संजय सुभाष पवार, वय ३० ४) सुनिल भिमराव शिंदे, वय ३६ ५) विशाल दादाराव शिंदे, वय २२ ६) शंकर विलास शिंदे, वय ३५ ७) आदिनाथ आबा शिंदे, वय ५०, सर्व रा. मांडवा, ता. वाशी, जि.धाराशीव व ८) शंकर लगमन काळे, वय ४२, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव असे असल्याचे सांगितले.
आरोपीकडे नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच जामखेड तालुक्यातील नागेबाचीवाडी, नायगाव, झिक्री व राजुरी येथून सोयाबीणच्या गोण्या चोरून नेलेबाबतची कबुली दिली.
खर्डा व जामखेड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील खालीलप्रमाणे ०५ चोरीचे गुन्हे उघडकीस
खर्डा पोलीस स्टेशन:
१)११५/२०२४ बीएनएस ३०३(२)
२)१९७/२०२४बीएनएस ३०३(२)
३)१९८/२०२४बीएनएस३०३(२)
जामखेड पोलीस स्टेशन:
६२३/२०२४बीएनएस३०३(२)
६३२/२०२४बीएनएस३०३(२)
तसेच ताब्यातील आरोपीकडे चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता, आरोपींना गुन्हयातील चोरून नेलेल्या ९० सोयाबीनच्या गोण्या या ईटकुर, ता.कळंब, जि. धाराशिव येथील व्यापा-यास विकल्याची माहिती सांगीतली. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीतांनी गुन्हयांत वापरलेले वाहन ५,००,०००/- रू किंमत वाहन क्रमांक एमएच-१२-सीआर-८८२० व ईटकुर, ता. कळंब, जि. धाराशिव येथून १,२९,०००/- रूपये किंमतीच्या ९० सोयाबीनच्या गोण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी खर्डा पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, , उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment