पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२० डिसेंबर
भाजपचे नेते राम शिंदे यांची गुरुवारी विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड झाली. कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.
राम शिंदे यांची निवड विधान परिषदेच्या सभापतिपदी होताच रोहित पवारांनी राम शिंदेंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?
"विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती महोदय मा. प्रा. राम शिंदे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रोहित आबा पाटील, मा. आ. प्रकाश गजभिये साहेब आणि रविकांत बोपचे हेही उपस्थित होते. स्व. ना. स. फरांदे साहेबांनंतर विधानपरिषदेचे सभापती या सर्वोच्च पदापर्यंत पोचलेले प्रा. शिंदे साहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ही निश्चितच गौरवाची बाब आहे." असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
No comments:
Post a Comment