जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे प्रमान वाढत आहे .अशातच खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदवाडी येथे चोरट्याने घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे घटना मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी घडली होती, घरामध्ये कोणी नसताना चोराने कुलूप तोडून घरफोडी केल्याचे घटना खर्डा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली होती. याबाबत फिर्यादी गणेश शाहू खाडे रा.आनंदवाडी तालुका जामखेड जि.आहिल्यानगर यांनी अज्ञात आरोपितांनी कुलूप तोडून घराचे कपाटातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले सदर घटनेबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गु.र.नं.१०/२०२५ बीएनएस कलम ३३१(४),३०५(अ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेबाबत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करणे बाबत आदेश दिलेले आहेत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रोहित मिसाळ, बाळू खेडकर, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकच रवाना केले.
शनिवार दिनांक २५/०१/२०२५ रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अमोल बापू काळे राहणार पांढरेवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव याने त्याच्या साथीदारासह केलेला आहे ते खर्डा बसस्थानक येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसमांचा खर्डा बसस्थानक येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले नाव विचारले असता त्याचे नाव १)अमोल बापू काळे, वय ३० रा.पांढरेवाडी,ता परांडा जि.धाराशिव २) विकास नागेश भोसले ,वय२७,रा.डोकेवाडी, ता.वाशी, जि. धाराशिव असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीची पंचाक समक्ष अंगझडती घेतले असता आरोपी अमोल बापू काळे याचे ताब्यातून १,०५,०००/रु किंमतीचे .त्यात १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व गंठण आरोपी विकास नागेश भोसले याचे ताब्यातून ७०,०००/रु. किमतीचे त्यात १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण १,७५,०००/ रुपये किंमातीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली तसेच अमोल बापू काळे याचेकडे आणखी कोठे गुन्हे केले असले बाबत विचारणा केली असता त्याने मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील बाळगव्हाण तालुका जामखेड येथे रात्रीच्या वेळी बंद घरात चोरी केल्याची माहिती सांगितली आहे आरोपीने दिलेल्या माहितीवरून खर्डा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दाखल गुन्ह्यांची पडताळणी करून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले दोन घरफोडीचे गुन्हे:
पोलीस स्टेशन गु.र.नं.व कलम
१) खर्डा- १०/२०२५ बीएनएस कलम ३३१(४),३०५(अ)
२)खर्डा-०४/२०२५बीएनएस कलम३३१(४),३०५(अ)
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना खर्डा पोलीस स्टेशन गुरनं 10/2025 या गुन्ह्याचे तपासा कामे खर्डा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करत आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे,कर्जत उपविभागीय अधिकारी यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेले आहे.
No comments:
Post a Comment