आपल्या पतंग उडविण्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये यासाठी पतंग उडवताना कोणीही बंदी असलेला नायलॉनच्या मांजचा कोणीही वापर करू नये अन्यथा सदर पतंग उडवणाऱ्या व्यक्ती व विक्री करणारे दुकानदार यांच्या विरूद्ध सक्त अशी कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.
याबाबत जामखेड पोलीस स्टेशन मकरसंक्रांती सणाच्या पुर्व दिनी आज दि.१३ जानेवारी रोजी रोजी दुपारी ४: ०० वाजताचे सुमारास जामखेड पोलीस ठाणे हद्दीत आगामी मकरसंक्राती सणाचे अनुषंगाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरण्यात संदर्भात नायलॉन मांजा वापरण्यास प्रतिबंध होवुन जनजागृती व्हावी यासाठी जामखेड शहरातील ल.ना.होशिंग विद्यालय व नागेश विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीना मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना मांजाचा वापर करू नये या बाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच मुख्य बाजारपेठ व शहरातील पतंग खरेदी विक्री दुकानदार यांना मांजा खरेदी विक्री करु नये अथवा जवळ बाळगु नये अन्यथा योग्य ती कडक कारवाई करण्या बाबत जनजागृती करण्यात आली.
तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील व्हॉटसॲप ग्रुप व सोशल मिडीयाचे माध्यमातुन नॉयलॉन मांजा वापर, विक्री व खरेदी होऊ नये या करीता जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे साधे वेशातील पोलीस अंमलदार यांचेकडुन मांजा विक्री दुकानांची तपासणी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. तरी पतंग उडविणारे व बंदी असलेल्या नायलॉन माजा विक्री करणाऱ्या व्यक्तींना कायद्याचा भंग करू नये असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment