छत्रपती संभाजीनगरमध्ये काळजाचा ठोका चुकणारी घटना घडली आहे. ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा (पीएसआय) नायलॉन मांजाने गळा चिरलाय. सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातून जात असताना ही घटना घडली. जखमी पोलिसाचे नाव दीपक पारधे असे आहे. ते आज नोकरीवर निघाले होते, त्याचवेळी मांजामुळे गरा चिरला गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय दीपक पारधे हे सध्या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. आज सकाळी ते ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. त्यामुळे गळा चिरला अन् रक्तस्राव होऊन बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या घटनास्थळी गेले असून नायलॉन मांजा लावून पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
No comments:
Post a Comment