नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांच्याकडे सुपूर्त केल्यापासून आजपर्यंत शहरात विविध ठिकाणी भरबाजार पेठेतून अनेक चोऱ्या झालेल्या आहेत यामध्ये घरफोड्या,दरोडे तसेच दुचाकी,चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचाही समावेश असून या चोऱ्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही त्यामुळे पोलीसांच्या निष्क्रिय कारभाराविरोधात बुधवार (दि.८) जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संतप्त नेवासकरांनी खोलेश्वर गणपती मंदिराजवळ एकञित येवून सामुहिकरित्या नेवासा पोलीस व नेवासा तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आणि २६ जानेवारीपर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाहीतर भारतीय प्रजासत्ताक दिनी नेवासा पोलीस ठाण्यासमोर संतप्त नेवासकर "स्वतःचेच तोंड काळे करुन नेवासा पोलिस ठाण्यासमोर घंटानाद करणार असल्याचा गर्भित इशारा फुले - शाहू आंबेडकरी चळवळीचे नेते संजय सुखधान यांच्या नेत्तृत्वाखाली संतप्त नेवासकरांनी तहसिलदार व पोलीस निरिक्षक जाधव यांना निवेदनाद्वारे दिला.
संतप्त नेवासकरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परभणे यांची चारचाकी अशोक लेल्यांट कंपनीचे वाहन चोरी होवून १५ दिवस होवून गेले तरी कोणत्याही प्रकारचा तपास अद्यापपर्यंत पोलीसांनी लावलेला नाही
तसेच नेवासा शहरात गोवंश तस्करी व गुटखा विक्रेत्यांवर नगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केलेली आहे परंतू ही बाब नेवासा पोलीसांच्या निदर्शनास आलेली नाही त्यामुळे नेवासा पोलीसांचा कारभार नेवासकरांना अंतर्मुख करणारा ठरलेला आहे पोलीसांकडून कोणतेही अवैध धंदे होत असल्याबाबत माहिती दिल्यास सदर माहिती देणाऱ्यालाच अवैध धंद्यावाल्यांकडून दमदाटी केली जाते तसेच त्या संदर्भात पोलिसांविरोधात सोशलमिडीयावर काही पोस्ट केल्यास आपल्याकडूनही सदर पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करु अशी धमकीही दिली जाते व काही पोस्ट करणाऱ्यांवर त्या पध्दतीने गुन्हाही नोंदविला जात आहे त्यामुळे नेवासकरांना पोलीसांच्या कारभाराबाबत 'तोंड दाबून मुक्क्यांचा मार' सहन करण्याची वेळ आली असल्याचे यावेळी संतप्त नेवासकरांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले आहे.
जर नेवासा शहरात झालेल्या चोऱ्यांचा तपास आपण आठ दिवसांत लावू शकला? तर नेवासकरांच्यावतीने पोलीसांना अकरा हजार रुपयांचे रोख बक्षिस देवून त्यांचा सन्मान करण्यात येईल आणि जर आपण तपास नाही लावू शकला नाही तर आपण स्वतः अकार्यक्षम अधिकारी आहात हे मान्य करुन आपली बदली कंट्रोल रुमला करुन घेण्याचे खुले आव्हाणही नेवासकरांनी पोलीसांना केले आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,नगरसेवक राजू मापारी,भाजपाचे मनोज पारखे,बजरंग दलाचे संतोष पंढूरे,अशोकराव ताके,वंचितचे रंजन जाधव,उबाठा सेनेचे नितीन जगताप,नगरसेविका सौ.शालिनी सुखधान यांच्यासह महीला - पुरुष व युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
नेवासा शहरात झालेल्या चोऱ्यांचा तपास आठ दिवसांत पोलीसांनी लावला तर नेवासकरांच्यावतीने पोलीसांचा सन्मान करत ११ हजार रुपयांचे रोख बक्षिस पोलीसांना देण्यात येणार आहे आणि तपास लागला नाही तर नेवासकर २६ जानेवारी रोजी नेवासा पोलीस ठाण्यासमोर स्वता:चे तोंड काळे करुन घंटानाद आंदोलन करणार अाहेत आणि या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी स्वता:हून मुख्यालयात बदली करुन घेण्याचे खुले आव्हाणही यावेळी नेवासकरांनी पोलीसांना दिले आहे.
No comments:
Post a Comment