पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२६ फेब्रुवारी २०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील नायगाव येथे दि 27 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी नायगावातील भाविकांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम नायगाव आणि परिसरातील सर्व भक्तांसाठी खास आहे, ज्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी "छावा" सिनेमा दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे नायगावातील लोकांना एक सांस्कृतिक आणि धार्मिक अनुभव मिळणार आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने रिलीजच्या आठवड्यातच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट तुफानी वेगाने कमाई करत आहे आणि सात दिवसांत बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त व्यवसाय केला आहे.आता हा सिनेमा जामखेड तालुक्यातील नागरिकांना हा सिनेमा मोफत पाहता येणार आहे.
महाशिवरात्री निमित्त नायगाव येथे "छावा"सिनेमा दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. 27/2/2025 रोजी सायंकाळी 8:30 वाजता जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील नायगाव येथे आयोजित केला जाणार आहे. आयोजकांनी सर्व भाविक भक्तांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम नायगाव परिसरातील लोकांसाठी एक आनंददायी आणि सांस्कृतिक अनुभव असणार आहे.
No comments:
Post a Comment