पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२६ फेब्रुवारी २०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नायगाव येथील कायमस्वरूपी दारू बंदी करावी यासाठी नायगाव येथील प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष सचिन उगले व सरपंच चंदू उगल यांनी पुढाकार घेऊन नायगाव गावातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करून दारू विकण्यास बंदी करण्यात यावी यासाठी काल दि. २५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय व खर्डा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे जवळा परिषद जिल्हा परिषद गट अध्यक्ष राहुल भालेराव, युवक शहराध्यक्ष प्रमोद खोटे. दत्तात्रय गायकवाड व प्रहार चे कार्यकर्ते व नायगावचे ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
आहिल्यानगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तालुक्यातील अव्यध्य धंदे बंद करनेबाबत जामखेड तालुक्यातील पोलीस स्टेशनला सूचना दिल्या असताना देखील जामखेड तालुक्यात अव्यध धंदे सर्रासपणे चालू आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतही देवदैठण येथील महिला व ग्रामस्थांनीही दारू दुकानदारांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील गावागावांमधून दारू बंदीची मागणी करण्यात आली येत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे अवैद्य धंदे सुरू आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतही देवदैठण येथील महिला व ग्रामस्थांनीही दारू दुकानदारांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे.आता पुन्हा खर्डा हद्दीतील नायगाव येथील अवैद्य दारू विक्री बंद करण्यात यावी याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाने खर्डा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयालाच निवेदन दिलेले आहेत आता पोलीस भूमिका घेणार ? याकडे सर्व खर्डेकरांचे लक्ष लागले आहे पोलीस खर्डा हद्दीतील अवैद्य धंद्यांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित झाला आहे.
No comments:
Post a Comment