खर्डा प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील गवळवाडी येथील एका मुलीस फुस लावुन पळवुन नेले आहे. या प्रकरणी गणेश पांडुरंग काळे रा. गवळवाडी याच्या विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गवळवाडी येथील फिर्यादीच्या राहते घरातुन दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री सुमारास यातील संशयीत, गणेश पांडुरंग काळे रा. गवळवाडी याने गवळवाडी येथील फिर्यादी यांची अपहरित मुलगी हिस आरोपी याने काहितरी अमिष दाखवुन फुस लावुन पळवुन नेवुन अपहरण केले आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून वरील आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा