जामखेड प्रतिनिधी : २० सप्टेंबर
जामखेड शहरातील दिव्यांगाना घरकुल बांधण्यासाठी शहरालगत असलेल्या झोपडपट्टी येथील गट क्र, ३०६ मधील शासकीय मिळावी तसेच या जागेवर घरकुलं बांधण्यासाठी
दिव्यांग व इतर गरीब लोकांना शासनाने परवानगी द्यावी यासाठी आ. रोहित पवार यांनी शासन दरबारी प्रयत्न करावा. अशी मागणी येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत आ. रोहित पवार हे जामखेड दौऱ्यावर असताना त्यांना प्रहार संघटनेच्या वतीने एक निवेदन वजा पत्र देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष नय्युम शेख, महिला तालुकाध्यक्ष सविता विधाते, उपाध्यक्ष मच्छिद्र शेळके, तालुका संघटक संभाजी पवार, तालुका उपाध्यक्ष यदा क्षिरसागर, युवती तालुकाध्यक्ष छकुली शिंदे, उपाध्यक्ष शबनम मॅडम, संतोष झगडे, अशोक वासकर, पृथ्वीराज लिमकर, जावेद बशिर तांबोळी, दिव्यांग संघटक संदीप भुजबळ आदी कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ् संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहराध्यक्ष नय्युम भाई सुभेदार तसेच सर्व दिव्यांग बंधू बहिणी व प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी सर्व मिळून आ. रोहित दादा यांना हात जोडून विनंती केली व घरकुल साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांना न्याय मिळावा गरिबांना न्याय मिळावा अशी विनंती केली.
यावेळी आ. रोहित दादांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. आ. रोहित पवार यांनी याबाबत नक्कीच विचार करू असे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा