जामखेड प्रतिनिधी:23 सप्टेंबर
नगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या आपुलकी व स्नेहाच्या आधारावर गेले तीन वर्ष नगरकरांच्या मनावर आरुढ होऊन वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दै.नगरी दवंडीचा तिसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.
वाचक, जाहिरातदारांबरोबरच, विविध राजकीय पदाधिकारी, संपादक, वार्ताहर, अधिकारी, पदाधिकारी सह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हे वैशिष्ट्य होते.
दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे यांना वर्धापनदिनानिमित्त जामखेड मिडिया क्लबच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव व नगरी दवंडीचे जामखेड तालुका प्रतिनिधी पप्पूभाई सय्यद, अविनाश बोधले, संपर्क प्रमुख धनराज पवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा