जामखेड प्रतिनिधी:११ सप्टेंबर
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुणे दौर्यावर आले असता पंचशील ग्रुपच्या वतीने तसेच रिपब्लिकन एम्पालॉईज फेडरेशन च्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा ब्राह्मण समाज आघाडीचे आरपीआय प्रदेशाध्यक्ष मंदार भाऊ जोशी व पंचशिल ग्रुपचे अध्यक्ष नागेश गायकवाड यांनी सदर निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केली त्याप्रसंगी पंचशिल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विलास कांबळे साहेब उपाध्यक्ष दीपक लोंढे खजिनदार सुभाष दादा पवार सेक्रेटरी गणेश भाऊ कदम सदस्य ज्ञानोबा बोडके तुकाराम कांबळे राजेश शीलवंत कायदेशीर सल्लागार भाऊसाहेब घोडेस्वार कैलास डोंगरे हे उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांच्या आयोगासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ आदेश देऊन तुमचा वेतन आयोग शंभर टक्के मिळवून देतो असे आश्वासन दिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा