जामखेड प्रतिनिधी : १२ सप्टेंबर
नेहमीच समाज कार्यात आग्रेसर असणाऱ्या व सभासदांप्रती कृत्यज्ञता व्यक्त करणाऱ्या श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को - ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. अहमदनगर या संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को ऑप . अर्बन क्रेडिट सोसायटी लि. शाखा जामखेड व बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ .०० ते दुपारी ४.०० पर्यंत मोफत शिबीरामध्ये अल्प दरात नंबरचे चष्मे दिले जातील. शिबीराकरीता येतांना आधारकार्ड , रेशनकार्ड झेरॉक्स व फोन नंबर, आपली चालु असलेली औषधे व डॉक्टरांचे रिपोर्ट, हे शिबीर १ वर्षाच्या बाळापासून वयोवृद्ध नागरिकांसाठी सुध्दा आहे. शिबीरासाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. या शिबीराचे आयोजन श्री.रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडीट सोसायटी लि. अ.नगरचे चेअरमन अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या सौजन्याने होत आहे.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि.अ.नगर वैभव किराणा जवळ , बीड रोड , अहमदनगर मर्चंट बँके समोर , जामखेड, हे शिबीराचे ठिकाण असून नांव नोंदणीसाठी संपर्क माया आल्हाट मो. ८८०५७५५६५४ ( ०२४२१ ) २२३०३३ अमित पिल्ले मो . ७०२०५५४ ९ ७८ जामखेड शाखा मो . ९ २२५३२८२४१, ९२२५३२८२४१ या नंबरवर संपर्क साधावा व नागरिकांनी शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा