जामखेड प्रतिनिधी : २ नोव्हेंबर
प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात
निधन झाले असून गाडीत आसलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय (५२,) सुन जागृती भुषण बोरा (वय २८), नात लियाशा भुषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल येथे तातडीने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरकडे रवाना करण्यात आले आहे. तर मुलगा भुषण शांतिलाल बोरा (वय ३४) हा कीरकोळ जखमी झाल्याने त्यास उपचार करून सोडण्यात आले आहे.
सविस्तर असे की, जामखेड येथील भांड्याचे प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा हे आपल्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते. येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतना त्यांचे चारचाकी वाहन (एम. एच. 16 ए. टी 8807) नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झाल्याने त्यांच्या कारचा भिषण अपघातात झाला.
जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी म्हणून ओळख असलेले भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (वय ५८ वर्षे) रा. जामखेड हे काही दिवसांपुर्वीच आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान या ठीकाणी देवदर्शनाला गेले होते. ते आज रात्री विमानाने पुणे विमानतळवर उतरले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या चारचाकी गाडीने ते सर्वजण पुण्याहून पहाटे जामखेड कडे निघाले होते. त्यांची गाडी आज दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास नगर जामखेड रोडवरील पोखरी पुढे असलेल्या धोकादायक वळणावर आली असता कार चालकाला अंदाज न आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून अचानक सदर चारचाकी गाडी पलटी होऊन भिषण अपघात झाला. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले.
या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले तर त्याच्या गाडीमध्ये आसलेले त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा, (वय ५२), सुन जागृती भुषण बोरा (वय २८), नात लियाशा भुषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा (वय ३४) हा कीरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन सोडण्यात आले आहे. मयत महेंद्र बोरा यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आसुन सायंकाळी पाच तपनेश्वर अमरधाम या ठीकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत महेंद्र बोरा हे व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधु होते. ते अतिशय मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली आहे.
अपघात झालेले ठिकाण हे अपघात प्रवणक्षेत्र असून या ठिकाणचे वळण व अरूंद पुलाचे कठडे नसल्याने यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत.
No comments:
Post a Comment