जामखेड प्रतिनिधी : ४ नोव्हेंबर
नाशिक व अमरावती विभागाच्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ होत असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय जनस्वराज्य सेना अध्यक्ष यांनी विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे पत्रकाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार निवडणुकीतील उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पदवीधर मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी काढले आहेत. या बाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व संबंधित कार्यालयांना ते पाठवण्यात आले तहसीलदार योगेश चंद्रे यांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
या बाबत काढलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ मिळणे बाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय जनस्वराज्य सेना अध्यक्ष यांची मुदतवाढ मिळणेबाबत या कार्यालयास उपरोक्त संदर्भाधिन पत्रे प्राप्त झालेली आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १/११/२०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. तथापि, याच कार्यक्रमांतर्गत दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून या काळामध्ये सुध्दा पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.
तसेच दिनांक ३० डिसेंबर, २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणी (continuous updation) निवडणुकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येणार आहे. या माहितीबाबत आपल्या स्तरावरून सर्व राजकीय पक्षांना अवगत करण्यात यावे. तसेच, त्याची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी
असे विनंतीवजा आदेश महाराष्ट्र राज्य उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी काढले आहेत.
No comments:
Post a Comment