जामखेड प्रतिनिधी : ४ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी बांधखडक येथील रहिवाशांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी चोंडी येथे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बांधखडक ग्रामस्थांच्या वतीने वरील मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांधखडक व
परिसरातील लोकसंख्येचा विचार करता बांधखडक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी ते व्हावे अशी मागणी बांधखडक येथील रहिवाशांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांधखडक हे गाव खर्डा व जामखेड शहरापासून दुर आहे. त्यामुळे या ठिकाणाहुन रुग्ण घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण होत असते. त्यामुळे तसेच ग्रामस्थ व रुग्णांना आरोग्याच्या विविध सेवा व प्राथमिक उपचार गावातच मिळावेत यासाठी आरोग्य केंद्र व्हावे यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना बांधखडक येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले.
यावेळी भाजपा ता. सरचिटणीस केशव वनवे, सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी पाटील, चेअरमन सखाराम वनवे, युवा नेते मंगेश वारे, बालाजी वनवे, रामचंद्र चव्हाण, नंदु सानप, सुशेन चव्हाण, अर्जुन दराडे, रोहीत वनवे, विजय वारे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment