जामखेड प्रतिनिधी : ४ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील विविध विषयांचा आढावा असणार्या तसेच अनेक सामाजिक विषयांवर भाष्य असणाऱ्या विकासात्मक, ऐतिहासिक, धार्मिक, आरोग्य, प्रबोधन, कायदेविषयक अशा अनेक लेखांनी परिपूर्ण अशा नगर व्हिजन दीपावली विशेषांकाचे अनावरण विविध मान्यवर व विविध ठिकाणी करण्यात आले. या बरोबरच मान्यवर वाचक व जाहिरातदार व हितचिंतकांकडून उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले.
यामध्ये जामखेड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व कर्मचारी तसेच पोलीस वारंट वृत्तपत्राच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड व पत्रकार समीर शेख हेही अवर्जून उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत नवनिर्वाचित संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंद सातपुते, गुरूकुल मंडळाचे जामखेड तालुकध्यक्ष पांडूरंग मोहळकर, शिक्षकनेते विकास बगाडे, गौतम सोले, बाळासाहेब नाकाडे, जनार्दन आजबे, मोहन खवळे शिवाजी हजारे, विकास वारे, आनंता राऊत, केशवराज कोल्हे, आशोक राऊत, अविनाश नवसरे, संतोष भोंडवेंसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड शहर कार्यालय येथे शहराध्यक्ष फायकअली सय्यद, जेष्ठ पत्रकार दैनिक गावकरीचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय राऊत, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, सुदाम वराट, अविनाश बोधले,मोहिद्दीन तांबोळी, शैफअली सय्यद
पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, विस्तार अधिकारी बापूसाहेब माने, सुनील मिसाळ, अशोक शेळके आदी
तर हाॅटेल मैथिली येथे जवळा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शहाजी आप्पा पाटील, ज्योती क्रांती मल्टीस्टेट चेअरमन आजिनाथ हजारे, युवा नेते उमेश रोडे, गौतम कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, सतीश हजारे उपस्थित होते.
दरम्यान अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँके येथे झालेल्या कार्यक्रम वेळी बँकेचे नवनिर्वाचित संचालक संतोषकुमार राऊत यांचा सदिच्छा मंडळाच्या वतीने केशवराज कोल्हे व पदिधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक येथे झालेल्या कार्यक्रम वेळी बँकेचे नवनिर्वाचित संचालक संतोषकुमार राऊत यांचा सदिच्छा मंडळाच्या वतीने केशवराज कोल्हे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment