खर्डा प्रतिनधी:५ नोव्हेंबर
खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या विद्यालयातील माजी विद्यार्थी तब्बल ५४ वर्षांनी एकत्र आले. विद्यालयातील सन १९६८ साल मधील दहावीच्या स्नेह मेळावा उत्साहात साजरा झाला. यावेळी जुने वर्गशिक्षक गोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहमेळावा पार पडला.
यावेळी शहरासह परिसरातील रहिवाशी असलेल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी उपस्थित होते. आपल्यातील जुन्या जाणत्या मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहून स्नेह मेळावा सुरु झाला. शालेय जीवन संपल्यानंतर प्रथमता एकत्र आलेल्यांनी एकमेकांनी विचारपूस करून समोर जुन्या वर्ग मित्राला पाहताच रडू कोसळून प्रेमाने आनंदाचे आलिंगन देऊन तब्येतीची व संसाराची विचारपूस केली. यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक कै. हरिभाऊ व्यवहारे यांचे चिरंजीव मिलिंद व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व जुने वर्गमित्र कामानिमित्त व नोकरीनिमित्त महाराष्ट्रासह देशभर विखुरलेले होते, जिवलगांचा स्नेह मेळावा मातृभूमीत आयोजित करण्यात आला होता. यामुळे मेळाव्यास आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणापासून ते आजपर्यंतच्या वाटचालींचा आढावा घेतला यामुळे अनेक जण भावूक झाले. शारीरिक व्याधी असतानाही हे 30 मित्र जवळ एकत्रित येऊन एकमेकाची आस्थेने विचारपूस करताना दिसून आले, विचारपूस करताना डोळ्याच्या कडा पाणावल्या डोळ्यांनी पाहत होते. परंतु जुना वर्गमित्र भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता.
यावेळी प्रदीप भाळवणकर ,डॉ.विक्रम निमकर, विशाला शहा, राजकवर बांठिया, उषा शिंदे, विमल भैसडे, पद्माकर जोशी ,सुधीर कुलकर्णी ,रमेश भोसले, विराज जव्हेरी, विलास गोलेकर, शामसुंदर पांडकर, दत्तात्रय जमकावळे ,भगवान कोरे ,अरविंद भागवत, वसंत देशमुख, बिबिषण निकम यांच्यासह उषा थोरात, सुनील साळुंखे, दिलीप रनभोर, किशोर कांकरिया, प्रकाश दिंडोरे, डॉ बिपिनचंद्र लाड, चंद्रकांत गोलेकर, तुकाराम विधाते, सुरेश गौड, राजेश गौड उपस्थित होते.दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यात मृत्यू झालेल्या सवंगड्यांना श्रद्धांजली वाहिली. स्नेहभोजन होऊन संगीत रजनीचा कार्यक्रम झाला.
मेळावा यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर थोरात यांनी प्रयत्न केले, सूत्रसंचालन सुनील साळुंखे तर आभार दिलीप रणभोर यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment