खर्डा प्रतिनिधी : ७ नोव्हेंबर
कर्जत जामखेडचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या निधीतून खर्डा किल्ला व शहरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यात आला. मात्र आमदार रोहित पवार यांनी खर्डा किल्ल्याजवळ भगवा ध्वज बसवला मोठा कार्यक्रम पण घेतला तेव्हा किल्ल्यासाठी मोठा निधी देतील असे जनतेला वाटत होते पण तसे झाले नाही. आता पुन्हा भाजपा व शिंदे गटाचे सरकार आले असून या सरकारच्या माध्यमातून पुर्वीप्रमाणेच निंबाळकर गडी व समाधी संवर्धनासाठी निधी आणून याठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे दिवाळी निमित्त भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२२ संपन्न झाल्या या स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. खर्डा येथील आय लव्ह शिवपट्टण ( I LOVE SHIVPATTAN) या संघटनेच्या वतीने या किल्ले बनवा स्पर्धेच व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काल दि. ६ नोव्हेंबर रोजी खर्डा येथील ऐतिहासिक निंबाळकर राजे समाधी जवळ हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना सुरवसे म्हणाले की, आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून अगोदर तीन कोटी आणले आणि आत्ता पुन्हा किल्ल्यासाठी तसेच बारा ज्योतिर्लिंगासाठी निधी आणणार आहोत आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून किल्ल्यासाठी मधील काळात भरीव निधी आणलाच होता. तर अजूनही किल्ल्याच्या कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तसेच खर्डा पंचक्रोशी व जिल्हा परिषद गटासाठीही मोठा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कला जाईल असेही मत रवींद्र सुरवसे यांनी केले.
यावर्षी खर्डा येथे पार पडलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे पहिले वर्ष होते. यापुढे या स्पर्धेत जास्तीत जास्त मुले-मुली सहभागी होतील असा विश्वास रवींद्र सुरवसे यांनी व्यक्त केले.
यावेळी पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे.
1) चि. ओमसाईराज रमेश इंगळे
2 )कु. मयुरी बबन नाईक
3) चि.यश शशिकांत गुरसाळी
1) चि. नयन जितेंद्र जावळे
2) कु. ज्ञानेश्वरी किशोर नाईक
3) चि. जवळे आर्यन अशोक
या कार्यक्रमासाठी कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रा.सदस्य वैजीनाथ पाटील , दीपक जावळे, महालिंग कोरे, महेश लोंढे ,बबलू गोलेकर, सोनू सुरवसे , व आय लव्ह शिवपट्टण संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते ,आदी मान्यवर नागरिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment