जामखेड प्रतिनिधी : ७ नोव्हेंबर
जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री शिवारात गणेश शिवाजी वारे या ३० वर्षीय तरूणास विवस्त्र करून जबरदस्त मारहाण करून खून करणाऱ्या दोन आरोपींनी पैकी मुख्य आरोपी दिपक रंजीत भवर यास अवघ्या १४ दिवसात अटक करण्याची जामखेड पोलीसांनी केली असून दुसऱ्याही अरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्यासही लवकरच ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक कसून तपास करीत असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.
या बाबत माहिती देण्यासाठी आज दि. ७ रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की. जामखेड शहरालगत असलेल्या धोत्री गावचे शिवारात कापसाच्या जुन्या जिनींग समोर दि. २४ आॅक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०६.३० वा सुमारास
अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाच्या एका पुरुषाचा नग्न अवस्थेत मृतदेह मिळुन आला होते. मयत तरूणाचे नाव गणेश शिवाजी वारे वय ३० वर्षे रा. संगमजळगांव तालुका गेवराई असे आसल्याचे निष्पन्न झाले.
सदर मयत तरूणास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाकरीता शरीरावर विविध ठिकाणी मारहाण करुन खुन केला होता. या प्रकरणी मयताचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं ४८५/२०२२ कलम ३०२ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्याकडे देण्यात आला होता. आरोपींना शोधण्यासाठी स्वतंत्र दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. याबाबत आजूबाजूचे साक्षीदार तसेच गुप्त बातमीदार यांच्या मार्फत आरोपींचा शोध घेत असताना सदर मयत गणेश वारे याचा खून आरोपी दिपक रंजीत भवर रा. सावरगाव, ता. जामखेड याने केला आसल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. यावरून दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व उपनिरिक्षक राजू थोरात यांचे पथकाने साकत फाटा परीसरातुन
आरोपी दिपक भवर यास ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा खुन केल्याची कबुली दिली.
त्याचा मागील काही दिवसापुर्वी मयत गणेश वारे याने आरोपी दिपक भवर याचा मोबाईल चोरी केला होता. दि. २३/१०/२०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वाजताचे सुमारास
मयत वारे हा मोहा फाटयावर दिसल्याने मुख्य आरोपी दिपक रंजीत भवर व त्याचा एक साथीदार दोघांनी त्यास मारहाण करीत स्कुटीवर बसवुन धोत्री शिवारातील जिनींगचे गेटसमोर घेऊन जाऊन व नग्न करुन त्यास चोरलेला मोबाईल कोठे ठेवला आहे. याची विचारणा केली. मात्र तो काहीच सांगत नसल्याच्या रागातुन काठया व होज पाईपने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा या मारहाणीत मृत्यू झाला.यावरून खुन केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिपक रंजीत भवर यास दि. ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक करून त्यास अटक करून जामखेड न्यालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. १० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कामगीरी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला,
श्रीरामपुरच्या अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पोलीस उप निरिक्षक राजु थोरात, पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोठुळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी, पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब अवारे, सचिन पिरगळ व डिबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.
एकंदर जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवली असून या घटनेमुळे जामखेड पोलीस स्टेशनच्या उत्कृष्ट कामगिरीत भरच पडली आहे. या कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment