जामखेड प्रतिनिधी : ३ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार व तालुका पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष श्रीराम बागडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचा निधनाने खर्डा परिसरासह सर्व पत्रकारांमधून शोक व्यक्त केला जात आहे.
जेष्ठ पत्रकार श्रीराम बागडे यांची जामखेड तालुक्यातील नावाजलेले पत्रकार म्हणून ख्याती होती. त्यांनी खर्डा व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच बाबतीत परिपूर्ण लिखाण करून सत्ताधारी पुढाऱ्यांना नेहमीच वठणीवर आणायचं काम केलं होतं. त्यांनी दैनिक सार्वमत व लोकमतचे पत्रकार म्हणून काम केले होते ते तरुण पत्रकारांना नेहमीच मार्गदर्शन करत. त्यांच्या दुःखद निधनाने खर्डा व परिसरात शोककाळा पसरली आहे. तसेच तालुक्यातील पत्रकारांना मधूनही मोठे दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मागे गौरव बागडे हा मुलगा आहे.
No comments:
Post a Comment