खर्डा प्रतिनिधी : १७ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील नागोबाचीवाडी व मुंगेवाडी बीएसएनएल सेवा मिळावी यासाठी आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला व प्रयत्नांना मोठे यश आले असून बीएसएनएलकडून या भागासाठी 4G संपृक्तता प्रकल्पासाठी टाॅवर मंजूर करण्यात आला असून जागेची उपलब्धता होताच नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी येथे बीएसएनएल सेवा सुरू होणार असून या भागातील मोबाईल धारकांना नेटवर्क बाबत येणाऱ्या अडचणी संपणार असल्याने मोबाईल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डा ग्रामपंचायत हद्दीतील नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी येथे बीएसएनएल सेवा सुरू व्हावी अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नव्हते. मात्र खर्डा ग्रामपंचायतचे कार्यकुशल सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी या कामात लक्ष घालून अगदी काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लावला आहे.
नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी येथे बीएसएनएल सेवा सुरू होत असून यासाठी टाॅवर उभा करण्यासाठी BSNL ला 2R खुली जमीन आवश्यक असून ती उपलब्ध करून देण्यासाठी जामखेड येथिल बीएसएनएल चे उपविभागीय अभियंता, यांनी खर्डा ग्रामपंचायतकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
याबाबत ग्रामपंचायतला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी येथे बीएसएनएल सेवा सुरू होत असून यासाठी टाॅवर उभा करण्यासाठी दोन गुंठे खुल्या जमिनीची आवश्यकता असून ग्रामपंचायत खर्डाच्या नावावर आहे व जीबीटी (ग्राउंड बेस टॉवर) उभारण्यासाठी आणि इतर स्थापित करण्यासाठी 4G सॅच्युरेशन प्रकल्पासाठी कोणताही खर्च किंवा भाडे न घेता BSNL ला द्यावी लागेल. USOF (युनिव्हर्सल सर्व्हिसेस ऑब्लिगेशन फंड) प्रकल्पांतर्गत नागोबाचीवाडी आणि मुंगेवाडी आणि जवळपासच्या गावांमध्ये मोबाईल कव्हरेज देण्यासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे हा टॉवर उभा राहावा यासाठी जागा लवकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment