जामखेड प्रतिनिधी : ९ डिसेंबर
दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून सारोळा येथील
अंगद सांगळे यांना तलवार, लोखंडी पाईप व दगडाने बेदम मारहाण करून त्यांच्या खिश्यातून रोख १० हजार रूपये, दोन तोळे सोन्याची चैन तसेच एक मोबाईल लंपास केला. व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी दिनेश खरात आणि त्यांच्या चार ते पाच जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर असे की या घटनेतील फीर्यादी अंगद किसन सांगळे हे त्यांची ज्यूपीटर स्कूटी क्र. हे MH16 CL 5922 वरून खर्डा ते जामखेड रोडने जामखेडकडे जात असताना यातील आरोपी दिनेश खरात रा. बटेवाडी व त्याचे सोबत असलेल्या इतर ४ अनोळखी आरोपींनी अंगद सांगळे यांना थांबवले. व त्यांनी सांगळे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैंसे मागितले असता सांगळे यांनी पैंसे न दिल्याचा राग आल्याने दिनेश खरात याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करत हातातील तलवारीने फिर्यादीचे डोक्यात मारून गंभीर दूखापत केली. व त्याचे सोबत असलेल्या इतर ४ अनोळखी आरोपींनी त्यांचे हातातील लोखंडी पाईप व दगडाने फिर्यादीचे डोक्यात, डावे हाताचे पंजावर, व उजवे हाताचे कोपरावर मारून गंभीर दूखापत केली. व आरोपी खरात याने फिर्यादीचे शर्ट व पँन्टचे खिशातील १० हजार रूपये रोख रक्कम व गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चैंन काढून घेतली. व त्याचे सोबत असलेल्या इतर ४ अनोळखी आरोपींनी अंगद सांगळे यांच्या खिश्यातील व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन काढून घेतला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यानुसार फिर्यादी अंगद किसन सांगळे वय 46 धंदा शेती रा.सारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश खरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. बटेवाडी ता. जामखेड व इतर अनोळखी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 329,143,147,148,149,आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना दि ७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५: ०० वाजताचे सूमारास जामखेड ते खर्डा जाणारे डांबरी रोडवर,बटेवाडी ता. जामखेड येथे घडली आहे.
यातील फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर जामखेड येथे प्राथमिक उपचार करून नगर येथील खाजगी हाॅस्पिटलला रवाना करण्यात आले असून पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन घेतलेल्या
जबाबावरून हा गुन्हादाखल करण्यात आला आहे. या घटनेत अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आले नसून सर्व आरोपी फरार आहेत.
घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा