खर्डा प्रतिनधी : १० डिसेंबर
खर्डा येथील परिषद प्राथमिक शाळा मुले, मुली व उर्दू या तिन्ही शाळांनी शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी संयुक्त पणे भाजीपाला व खाद्यपदार्थ बाजार भरवला होता. सदर बालआनंद मेळावा व भाजीपाला बाजार उत्सवाचे खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच आसाराम गोपाळघरे व उपसरपंच श्रीकांत लोखंडे यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.
आजचा अधुनिकतेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यावहारिक ज्ञान व्हावे, गणिती क्रिया व व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालता यावी, व्यवसायिक ज्ञान व्हावे, विद्यार्थी निर्भीड पणे वावरावा यासाठी सदर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवात शाळेतील मुलांनी बनवलेले पर्यावरण, मुलींचे शिक्षण यावरील पोस्टर पाहून सर्व पालक व प्रतिष्ठित नागरिकांनी कौतुक केले.
प्रसंगी मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, जावळे, चद्रकांत गोलेकर, तुळशीदास गोपाळघरे, डॉ. खोत, डॉ.लाड, प्रवीण कुंभार, पत्रकार किशोर दुशी, आदी मान्यवरांंसह पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थीत होते. खर्डा मुले, खर्डा मुली, खर्डा उर्दू या तिन्ही शाळेंचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य यांनी सुद्धा आवर्जून उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राम निकम, गिते बाबुराव, सय्यद समीना व शाळेतील शिक्षक चंद्रकांत अरण्य,जानकीराम खामगाळ, मोहळकर दिनकर, संतोष वहिल, ढवळशंख ज्योती, रासकर ज्योती, श्रीहरी साबळे, रत्नप्रभा शिरसाठ, सय्यद निसार, अमोल घाटूले, अमोल गोरे आदी शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा