खर्डा प्रतिनिधी : ९ जानेवारी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खर्डा येथील बसस्थानका समोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली, व क्रिकेटच्या बॅट उंचावून एकमेकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला,व यावेळी मोठ्या घोषणा दिल्या रोहित दादा तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है,एकच वादा रोहित दादा अशाप्रकारे आनंद व्यक्त करत मोठ्या घोषणा कार्यकर्ते देत होते . फटाके फोडून, घोषणाबाजी व जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बैठक रविवारी दि. ८ जानेवारी रोजी पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. यावेळी रोहित पवार यांना क्लब गटाकडून सदस्यपदी निवडले गेले आणि त्यानंतर त्यांची एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आ. पवार एमसीएच्या १६ सदस्यीय समितीत नव्याने जोडले गेले असून बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदाविषयी मोठा निर्णय घेऊन त्यांच्यावर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार देखील यापूर्वी एमसीएचे अध्यक्ष राहिले आहेत. शरद पवारांनी २०१३ आणि त्याआधी २००१-०२ मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदाची भूमिका पार पाडली होती. आता शरद पवारांचा हा वारसा रोहित पवार पुढे चालवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त खा. शरद पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
आ. रोहित पवार यांना स्वतःला देखील क्रिकेटची खास आवड आहे. त्यांना अनेकदा सर्वसामान्यांसोबत क्रिकेट खेळताना पाहिले गेले आहे. त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील अनेकदा त्यांच्या मतदारसंघातील संघांसोबत क्रिकेट खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. आता त्यांची थेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने एक मोठी जबाबदारी ते यापुढे पार पाडणार आहेत.
यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, दीपक जावळे, विकास शिंदे, कपिल लोंढे, नितीन गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, किशोर बोडखे, हरी सुर्वे ,संतोष लष्करे, सचिन चव्हाण, ईश्वर सुर्वे, राजाभाऊ सुर्वे, राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment