जामखेड प्रतिनिधी : ८ जानेवारी
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त पार पडलेल्या सामन्यामध्ये शेतकरी क्रिकेट संघ विजेता तर पोलीस क्रिकेट संघ उपविजेता ठरला असून या संघांना जामखेड न्यायालयाचे न्यायाधिश रजनीकांत जगताप यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्थापना दिन सप्ताह निमित्त जामखेड येथिल शंभूराजे क्रिकेट मैदानावर ७/१/२३ पासून दि ८/१/२३ पर्यंत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधिश रजनीकांत जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यामध्ये ८ संघ
निमंत्रित होते. स्पर्धेतील पहिला उपांत्यपुर्व सामना व्यापारी क्रिकेट संघ व शेतकरी क्रिकेट संघ यांच्यात होऊन शेतकरी संघ विजयी ठरला तर दुसरा उपांत्यपुर्व सामना पोलीस क्रिकेट संघ व शिक्षक क्रिकेट संघ याच्यात होवून पोलीस संघ विजयी ठरला. तर स्पर्धेतील अंतिम सामना पोलीस संघ व शेतकरी संघात होवून शेतकरी संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. या संपुर्ण स्पर्धेत शेतकरी संघ अजिंक्य राहीला. स्पर्धेत मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज संभाजी गायकवाड (पोलीस संघ), अंतिम सामन्यांत सामनावीर जीवन काटकर ( शेतकरी संघ), उत्कृष्ट गोलंदाज आबासाहेब आवारे (पोलीस संघ), तर पंच म्हणून राहूल राऊत, अविनाश ढेरे, राजूभाई तांबोळी, ॲड प्रमोद राऊत यांनी काम पाहीले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरणही जामखेड न्यायालयाचे न्यायाधिश रजनीकांत जगताप यांचेच हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार उपस्थिती जामखेड तालूका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नासीर पठाण, लियाकत शेख,
ओंकार दळवी, समीर शेख, धनराज पवार यांचेसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment