खर्डा प्रतिनधी :१० जानेवारी
पत्रकारिता हे मोठे कठीण काम आहे. कोणतेही राजकीय पदाधिकारी किंवा सरकारी अधिकारी असोत त्यांच्यावर पत्रकारांचा एक आदरयुक्त दबाव असतो. या दबावातून सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. खर्डा येथील सर्वच पत्रकार आपल्या आपल्या पद्धतीने चांगलेच काम करत आहेत. खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत काम करताना मलाही चांगल्या प्रकारचे सहकार्य करत असतात. तसेच सहा जानेवारीला
खर्डा येथे नवीन प्रेस क्लबची स्थापना झाली आहे. त्यांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. यापुढे पत्रकारांनी असेच काम करत राहावे असे मनोगत सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे,
ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर, वैजनाथ पाटील, दीपक जावळे,महालिंग कोरे,राजू मोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार दत्तराज पवार, श्वेता गायकवाड, अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन शासनाने पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त खर्डा येथील सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी खर्डा ग्रामपंचायत येथे पत्रकार दिन साजरा करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा देताना ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. खर्डा येथील सर्व पत्रकार आपल्या आपल्या परीने चांगले काम करत असतात. पत्रकारांचा आपण सन्मान केला पाहिजे. मी आता रोज बातम्या पाहतो. त्यामध्ये कोणतीही छोट्यात छोटी पण बातमी पत्रकार आपल्या अँगलने किती छान पद्धतीने मांडत असतात ते मी रोजच वाचतो. खर्डा ग्रामपंचायतच्या ज्या बातम्या छापल्या त्या पण खूप छान व कौतुकास्पद असतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांची बुध्दीमत्ता खूप तेज असते. पत्रकार दिनानिमित्त खर्डा येथे नवीन प्रेस क्लबची जी स्थापना झाली आहे. त्या प्रेस क्लबला माझ्याकडूनही मनापासून शुभेच्छा आहेत.
यावेळी पत्रकारांच्यावतीने पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून आपण निर्भीड पत्रकारिता केली पाहिजे. आपल्या गावातील महिलांच्या संबंधित काही विषय असेल तर त्या मला येऊन बोलू शकतात. माझ्या लेखणीच्या माध्यमातून ते मांडत जाईल. यापुर्वी गावाच्या विकासाबाबत आज पर्यंत खर्डा येथील कोणत्याही सरपंचांनी स्वतःची मुलाखत दिलेली नाही. सरपंच आसाराम गोपळघरे यांची मुलाखत मी पोलीस वारंट मध्ये लिहून प्रसिद्ध केली. खर्डा हे गाव कशाप्रकारे विकासाच्या मार्गाने चाललेले आहे. हे मुलाखतीद्वारे मांडले. नव्याने स्थापन झालेल्या खर्डा प्रेस क्लबला शुभेच्छा देताना श्वेता गायकवाड म्हणाल्या की
आपण संघटना तर केलीय, पण संघटनेचा अर्थही समजून घेतला पाहिजे. पत्रकारांनी नेहमी मीटिंग घेऊन पत्रकार व गावाच्या विकासासाठी चर्चा केली पाहिजे. संघटनेमध्ये एकत्रितपणा व सर्वांचे निर्णय एक सारखे असणे खूप गरजेचे असते या नवीन संघटनेला शुभेच्छा देऊन. कार्यक्रम घेऊन पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते सरपंच आसाराम गोपाळघरे व सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ पाटील व सोपान गोपाळघरे श्रीकांत लोखंडे आणि पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी पण पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment