जामखेड प्रतिनिधी : १८ जानेवारी
मी मंत्री असताना जामखेड शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे प्रस्ताव मी स्वतः पाठवले होते. त्यानुसार खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा केल्याने त्या कामांना मंजुरी मिळाली आहे. व त्यानुसार संपुर्ण तालुक्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. मात्र विरोधी लोकप्रतिनिधी आम्ही ज्या कामांना मंजुरी आणली त्याच कामांची भुमीपुजने व श्रेय घेत असून त्याची सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून चाललेल्या विकास कामांबाबत संबंधित मंत्री यांच्या सोबतचे फोटो टाकून कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नुसते पत्र व फोटो टाकून हजरो कोटींची कामे मंजूर होत नसतात त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा लागतो. अशी टीका माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली.
नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे, आ. राम शिंदे व जामखेड भाजपाच्या वतीने जामखेड येथे पत्रकार दिनानिमित्त स्नेह संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे, आ. राम शिंदे यांच्या सह नगरसेवक अमित चिंतामणी, भाजपा कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नेश्वर झेंडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन गडदे, सरपंच महारुद्र महारनवर, अंकुश ढवळे, गोरख घनवट, मनोज कुलकर्णी, ॲड. प्रविण सानप, सोमनाथ राळेभात, बाजीराव गोपाळघरे, मोहन देवकाते, पृथ्वीराज वाळूंजकर, गणेश आजबे, विनोद बेलेकर, प्रविण चोरडिया, कैलास वराट, तुषार पवार, ॲड. बंकट बारवकर, प्रा. अरूण वराट, बापूराव ढवळे, अरूण म्हस्के, सलीम बागवान, सोमनाथ पाचारणे, उध्दव हुलगुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच विविध पत्रकार संघाटनाच्या प्रतिनिधींनीही आपापली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले
की ,पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित युवक युवती आईवडिलांच्या परस्पर पळून जाऊन विवाह करत आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. हा एक चांगल्या समाज रचनेसाठी धोका असून ही मुले आपल्याला काबाडकष्ट करून जगणाऱ्या व शिक्षण देणाऱ्या आईवडिलांना अब्रूला कलंक आहे.
सज्ञान झालेल्या मुलामुलींना आपल्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र निर्णय घेताना आपल्याच आईवडलांना अपमानित करण्यात कसले स्वातंत्र्य, त्यांचा मानसन्मान धुळीस मिळविण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित करत, यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इतर कामाबरोबर समाजात असे प्रकार घडू नयेत यासाठी शाळा काॅलेजात जाऊन याबाबत जनजागृती करावी असे आवाहन करतानाच असे प्रकार घडू नयेत एक वेगळा कायदा करावा यासाठी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास वराट तर आभार शरद कार्ले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा