पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १९ फेब्रुवारी
जामखेड शहरात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व बौद्ध समाजाच्या वतीने अभिवादन करून समता बंधुताचा संदेश देत अनोखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला..
शहरातील संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, राजन समिंदर , भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, संचालक सागर सदाफुले, राजेंद्र सदाफुले, दादासाहेब घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, रतन सदाफुले, विनोद सोनवणे, सचिन सदाफुले, संतोष थोरात, बाळु काकडे, प्रमोद सदाफुले, दिपक घायतडक, नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाणे, देवा मोरे, रमेश आढाव, सुजित धनवे,सोमनाथ आढाव, आदी भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोलताना विकीभाऊ सदाफुले म्हणाले की, शिवरायांची जयंती मराठा समाजानीच साजरी का करावी? स्वराज्य निर्माण करताना महाराजांबरोबर अठरापगड जातीचे मावळे होते. म्हणून शिवरायांची जयंती साजरी करणे आमचे आद्यकर्तव्य आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,संजय काशिद,अशोक निमोणकर,बापूसाहेब गायकवाड,सागर सदाफुले,राजन समिंदर,संतोष गव्हाळे,शिवाजी ससाणे,इ.भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वीसाठी प्रिन्स ग्रुपचे अध्यक्ष सनी सदाफुले, अक्षय घायतडक, मनीष घायतडक, अमोल गव्हाळे, अविनाश सदाफुले, अशोक सदाफुले, अक्षय गायकवाड, मिलिंद भोसले, सुमित काबंळे, अतिश गायकवाड, अजित घायतडक, विशाल निकाळजे, रोहित सदाफुले, तुषार डाडर, विकी आहेर यांनी परिश्रम घेतले..
No comments:
Post a Comment