पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १९ फेब्रुवारी
मी बँकेचा कर्मचारी आहे. तुमचे तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे असे सांगत एका ठगाने जामखेड येथील फिर्यादीच्या क्रेडीट कार्ड वरून ९९.७४५ रुपयाची खरेदी करून तसेच बँकेच्या खात्यातील ५६८२२ रुपये काढून घेवून एकुण १ लाख ५६ हजार ५६७ रुपयाचीं फसवणुक केली असल्याची घटना घडली आहे.
जामखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले या प्रकरणातील फिर्यादी रामचंद्र अभिमन्यु शिंदे (वय ५७ वर्षे) रा. शिक्षक कॉलनी, बीड रोड जामखेड यांना यातील आरोपी दिपक वर्मा रा.एस.बी. आय. बँकेचे मुख्य ऑफिस बांद्रा याने त्याचे मो.नं. ८९१०९४८९५८ यावरुन फोन करून, मी बँकेचा कर्मचारी बांद्रा मुंबई येथून बोलत आहे. असे म्हणत फिर्यादी यांना वारंवार फोन करून क्रेडीट कार्ड अपडेट करण्याचे सांगुन ओटीपी घेवुन तसेच फिर्यादी यास प्ले स्टोअर मधून अँप डाऊलोड करावयाचे सांगुन लिंक वर क्लीक करावयाचे सांगुन फिर्यादीचे क्रेडीट कार्ड वर ९९.७४५/- रुपयाची खरेदी करून व बँकेचे खातेवरिल ५६८२२/- रुपये काढून घेवून फिर्यादी यांची एकुण १,५६,५६७/-रुपयाची फसवणुक केली आहे. याबाबत
फिर्यादी रामचंद्र अभिमन्यु शिंदे (वय ५७ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक वर्मा, रा. एस.बी. आय. बँकेचे मुख्य ऑफिस बांद्रा याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला भा.दं.वि.क. ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ११ फेब्रुवारी ते दि. १२ फेब्रुवारी २०१३ चे दरम्यान घडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे करत आहेत.
नागरिकांनी आॅनलाईन फसवणूकीसासून सावध राहावे, पो. नि. संभाजीराव गायकवाड
अमुक बँकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्वास ठेवू नका. बँका असे फोन कधीच करीत नाहीत. तसा फोन आला तर लगेच बँकेत जाऊन चौकशी करावी. आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे शक्यतो फोनवरून आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये व आपली फसवणूक टाळावी.
संभाजीराव गायकवाड -
पोलीस निरीक्षक, जामखेड
No comments:
Post a Comment