पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १९ फेब्रुवारी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्व जगाला मार्गदर्शक असे आहेत. . त्यांनी आठरापगड जातींना एकत्र करून स्वाराज निर्माण केले. शिवरायांची जयंती आज जगभर साजरी केली जाते. चारशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राज्य कारभाराचा आजही आदर्श घेतला जातो. त्यांच्या अधूनिक विचारातून निर्माण झालेले गडकिल्ले त्यांच्या विचारांइतकेच अभेद्य आहेत. आजच्या पिढीने त्यांचे विचार आचरणात आणल्यास एका निकोप व आदर्श समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आज दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता खर्डा बसस्थानक येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाव्दारे छ. शिवरायांना आदरांजली अर्पण केली.
या जयंती सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी खर्डा यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा, ग्रामपंचायत सदस्य वैजिनाथ पाटील, मदन गोलेकर, डॉ सोपान गोपळघरे, महेश दिंडोरे, गणेश शिंदे, नानासाहेब गोपळघरे, बाजीराव गोपळघरे, भास्कर गोपळघरे, बाळू गोपळघरे, नंदूकुमार गोलेकर, राजेंद्र गोलेकर, राजू झिक्रे, टिल्लू पंजाबी, जायभाय, गोटू कांबळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निकम सर, आरणे सर, गुरसाळे सर, व डॉ. लाड , डॉ खोत आदी मान्यवरांंसह खर्डा येथील शिवप्रेमी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भाजपा नेते रविंद्र सुरवसे म्हणाले की, खर्डा ही ऐतिहासिक भुमीही छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक भाग असल्याने कर्जत जामखेडचे सुपुत्र माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी मागील फडणवीस सरकारच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आताही राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार असल्याने आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून खर्डा विकासासाठी मोठे काम करण्याचा संकल्प आहे.
मोठ्या उत्साहात झालेले जयंती सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment