जामखेड प्रतिनिधी : ५ फेब्रुवारी
अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जामखेड शहरात तीन ठिकाणी छापे टाकून एक लाख तीन हजार रुपयांचा गुटख्याचा माल हस्तगत केला. दोघांना अटक केली, तर एक जण फरार झाला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईने शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट यांनी जामखेड पोलिसांत दिलेल्या
फिर्यादीनुसार सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ६:०० वाजता जामखेड पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलिस कॉन्स्टेबल संतोष लोंढे, संदीप चव्हाण, राहुल साळुंके यांच्यासह सरकारी वाहनाने जामखेड शहरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान
त्यांना जामखेड शहरात होत असलेल्या अनाधिकृत रित्या अवैध गुटखा विक्री होत असले बाबत माहिती मिळाली. त्यानुसार खर्डा चौकातील स्टार गोळी सेंटरमध्ये फारुक सय्यद (वय २८, रा. गोरोबा टॉकीज कुंभारतळे) याच्या दुकानात छापा टाकला असत.
३ हजार १६८ रूपये किमतीचा १८ पुडे गुटखा, सुगंधित पानमसाला २४ पुडे किंमत ३ हजार ८४०, पानमसाला ११ पुडे किंमत २ हजार १७८, असा ९ हजार ९५४ रुपयांचा माल जप्त केला. त्यानंतर खर्डा रोडवरील फजल कुरेशी याच्या जनता गोळी सेंटर येथे केला. यामधे पानमसाला ५५ पुडे ६ हजार ६०० रुपये, सुगंधित पानमसाला २० पुडे ३ हजार ८४०, गुटखा सात पुडे १ हजार ३३०, असा एकूण ११ हजार ७७० रुपयांचा माल जप्त केला.
त्यांनी हा माल कोठून घेतला असे पोलिसांनी विचारले. त्यांनी हा माल विनोद तोंडे (रा. शिक्षक कॉलनी) याच्या कडून घेतल्याचे सांगितले. यानुसार त्या दोघांना घेऊन पोलिस विनोद तोंडे याच्या घरी गेले. तेथे तो मिळून आला नाही. त्याच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता पानमसाला ३१८ पुडे किंमत ३८ हजार १६०, पानमसाला २२५ पुडे किंमत ४३ हजार २००, असा एकूण ८१ हजार ३६० रुपये किमतीचा माल जप्त केला. विनोद तोंडे फरार झाला आहे. तिघांकडे मिळून १ लाख ३ हजार ८० रुपयांचा माल जप्त. यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट यांनी जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आला असून. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
सदरची कारवाई अहमदनगर येथील पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पथकातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलिस नाईक शंकर चौधरी, पो. ना. संतोष लोडे, पो. ना. संदीप चव्हाण, पो. ना. राहुल सोळंके, पो. ना कमलेश पाथरुड यांनी हि कारवाई केली.
No comments:
Post a Comment