पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ मार्च
शहरांमधील गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुर, लोककलावंत,अंध-अपंग व महिला यांच्यावरती अलीकडच्या काळात मोठा प्रमाणात अन्याय, अत्याचार,शोषण, पिळवणूक केली जात आहे, त्याचबरोबर जामखेड शहरातील गावगुंडांनी टोळ्या तयार करून धमकी देऊन दहशत निर्माण करणे,खंडणी मागणे,गोर गरीब महिलांवरती जबरी अत्याचार करणे, असे प्रकार दिवसां-दिवस वाढत चालले आहेत.
असाच एक प्रकार काल दि. २१ मार्च २०२३ रोजी रात्री जामखेड शहरातील कलाकेंद्रवर एका गुंडाच्या मोठ्या टोळीने हातात शस्त्र घेऊन महिलांना मारहाण, छेडछाड व त्यांना धमकी देऊन खंडणी द्या नाहीतर कलाकेद्र चालु देणार,असे म्हणुन जबरी मारहाण करून तेथील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच पैसे व मैल्यवान वस्तूंच्या चोरी केल्या. अशाप्रकारे दहशत निर्माण करुन तीन कलाकेद्रवरची सर्व मोडतोड देखील केली आहे. त्यामुळे आता जवळपास ३०० कलाकार मंडळी दहशतीखाली आहेत. या सर्व घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी
दि. २४ मार्च रोजी जामखेड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.
तरी दि.२४ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता जामखेड एस. टी. बस स्थानकावरुन निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, अझहर भाई काझी, सचिन जाधव (अहमदनगर), रा. काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे, अभिजीत काळे,वंचीत आघाडीचे राज्याचे नेते डॉ.अरुण (आबा)जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, सुर्यकांत मोरे, आमित चिंतामणी, डॉ.भास्कर मोरे, पांडुराजे भोसले, समीर चंदन, रमेश आजबे, अमित जाधव, गुलशन अंधारे, प्रदिप टापरे प्रा. विकी घायतडक, विकी (भाऊ) सदाफुले, बापुसाहेब गायकवाड, बापुसाहेब ओव्हळ, बबन तुपेरे, नरेंद्र जाधव, पवन डावकर, अतिश पारवे, सनी सदाफुले तसेच विविध पक्ष संघटनाचे मान्यवर प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी जामखेड शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व पक्ष, संघटना, व्यापारी, उद्योजक, या सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment