पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ मार्च
आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संचलित श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा येथे भूगोल विभागाच्या वतीने २३ मार्च हा 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जामखेड महाविद्यालयाचे प्रा. अरुण जाधव, प्रा. किरण खेडकर, प्रा. मोहसीन शेख, प्रा. महेश बजगुडे सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी 'जागतिक हवामान दिन' च्या पार्श्वभूमीवर
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण घोडके यांनी हवा प्रदूषणाविषयी माहिती देऊन, हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपली भूमिका अग्रही असली पाहिजे आहे असे मत व्यक्त केले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार खिस्ते यांनी ऑक्सिजनची बचत करणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी झाडे लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. शिवानंद जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संभाजी नलावडे यांनी केले.
No comments:
Post a Comment