पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २२ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीसह विविध जिल्ह्य़ात मोठे भाविक असलेल्या श्री. संत सिमाराम बाबा उंडेगावकर यांच्या नावाचे कायम स्मरण व्हावे म्हणून आज दि. २२ मार्च रोजी मराठी वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खर्डा ते जामखेडकडे जाणारा तसेच खर्डा ते जातेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जातेगाव फाटा या चौकाचे श्री. संत सिताराम बाबा चौक नामकरण करण्यात आलेआहे यामुळे सिताराम बाबांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खर्डा ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.
आज दि. २२ रोजी प्रत्यक्ष नामकरणाचा फलक लावूनच जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर , माजी सरपंच राम (दादा) भोसले, बाळासाहेब गोलेकर, उद्धव ढेरे ,महालिंग महाराज ,गीते महाराज, सुहास गोलेकर तसेच कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खर्डा येथील सिध्दहस्त संत सिताराम बाबांचे खर्डा पंचक्रोशीसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आहेत. तसेच गडाला भेट देणाऱ्या भाविकांची दररोजची संख्याही मोठी आहे. आज खर्डा ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment