पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२१मार्च
आ.प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने सध्या मतदारसंघात सुरू असलेली विकाससकामांची उलथापालथ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.विधान परिषदेवर संधी मिळाल्यापासून आ.राम शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघाला एक-पाठोपाठ भरीव निधी उपलब्ध होत आहे. मंत्रिमंडळातील नेते-मंत्री आदींच्या गोटात त्यांचे असलेले राजकीय वजन ही त्याचीच पोचपावती आहे.
आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील ९ रस्त्यांसाठी तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीस शिंदे-फडणवीस सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष योजना ५०५४ (०४) अंतर्गत ही कामे मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजुर झाली आहेत. या मंजूर कामांमध्ये जामखेड तालुक्यासाठी ८ रस्त्यांचा तर कर्जत तालुक्यातील एका रस्त्याचा सामावेश आहे.
मंजूर झालेली कामे खालील प्रमाणे:
जामखेड तालुका
१)सातेफळ लोणी आनंदवाडी बांधखडक तेलंगशी रस्ता प्रजिमा १०७ किमी ४/७०० ते ८/१०० सुधारणा करणे (भाग वाकी ते लोणी फाटा) रक्कम २ कोटी ५० लक्ष
२)रामा५७ते राजुरी-आपटी-सोनेगावरस्ता प्रजिमा ७२ किमी ३/४५०ते ४/००० सुधारणा करणे (भाग पिंपळगाव आळवा गावाजवळ) रक्कम १ कोटी
३)शिऊर नाहुली देवदैठण धामणगाव तेलंगशी रस्ता प्रजिमा ७३ किमी ५/२५० ते ८/६०० सुधारणा करणे (भाग नायगाव फाटा ते नाहुली) रक्कम ३ कोटी
४)शिऊर नाहुली देवदैठण धामणगाव तेलंगशी रस्ता प्रजिमा ७३ किमी १२/०० ते १९/५०० सुधारणा करणे (भाग नाहुली ते धामणगाव नायगाव) रक्कम ५ कोटी
५)रामा ५५ ते आनंदवाडी नायगाव देवदैठण साकत कोल्हेवाडी ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ७४ किमी १४/०० ते १५/३०० व किमी १८/५०० ते १९/५०० कोल्हेवाडी गावातील लांबीमध्ये कोंक्रेटिकरण व सुधारणा करणे (भाग साकत गाव) रक्कम २ कोटी ५० लक्ष
६)रामा ५५ पासुन अरणगाव पिंपरखेड हळगाव ते जवळा प्रजिमा १०२ किमी ५/५०० ते ६/५०० पिंपरखेड गावातील लांबी कोंक्रेटिकरण करणे (भाग पिंपरखेड गावातील लांबी) रक्कम २ कोटी ५० लक्ष
७)रामा ५५ पासुन अरणगाव पिंपरखेड हळगाव ते जवळा प्रजिमा १०२ किमी ७/८०० ते ९/८०० गावातील लांबी सुधारणा करणे (भाग पिंपरखेड) रक्कम १ कोटी ५० लक्ष
८)रामा ५७ ते जामखेड जमादारवाडी सारोळा खुरदैठण गुरेवाडी धोंडपारगाव रस्ता प्रजिमा १०६ किमी ३/०० ते ६/०० सुधारणा करणे (भाग जमदारवाडी ते सारोळा) रक्कम ३ कोटी
कर्जत तालुका:
१)रामा ६० ते निमगाव खलू अजनुज पेडगाव शेडगाव जलालपूर सिद्धटेक फाटा रामा ६८ रस्ता प्रजिमा ०३ किमी २०/२०० ते २२/९०० व २६/१०० ते २७/३०० सुधारणा करणे (भाग शेडगाव फाटा ते सिद्धटेक फाटा) रक्कम ३ कोटी
एकंदरीत तालुक्यातील आ.राम शिंदे यांनी मतदारसंघात विकासकामे खेचून आणण्याचा धडाका लावला आहे त्यामुळे नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.विकासकामे खेचून आणण्याची त्यांची हातोटी नक्कीच मतदारसंघाचे रुपडे बदलवणारी आहे.
आता यापुढे मतदारसंघाचा जलदगतीने विकास
'गेली अडीच वर्षाच्या कालखंडात कर्जत-जामखेड मतदारसंघाचा विकास रोडावला होता. मात्र आता विकासाची गती वाढली आहे.किंबहुना पुढील काळात यापेक्षा जास्त विकासनिधी खेचून आणण्याचा माझा प्रयत्न राहील. निरंतर पाठपुरावा आणि शिंदे-फडणवीस सरकारचे सहकार्य यामुळे पुढील काळात मतदारसंघात कायापालट होईल.निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानतो.'
आ.प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment