पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २९ मार्च
जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत आगामी काळात होत असलेल्या
येथे श्रीराम नवमी उत्सव, महावीर जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व रमजान ईद अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शांतता समिती सदस्य, जातीय सलोखा समिती, राष्ट्रीय बजरंग दल व श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य, मौलाना यांची बैठक घेण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या व कायदा सुव्यवस्थेचे नियम मोडणाऱ्यांविरूध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीसाठी मिटींगसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांतता कमिटी सदस्य प्रा. मधुकर राळेभात, रा. काॅ. चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, नगरपरिषद मुख्याधिकारी अधिकारी अजय साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे,
बापूसाहेब गायकवाड, सुरेश भोसले, हरिभाऊ बेलेकर, निखिल घायतडक, प्रदीप टापरे, खलील मौलाना, शामिर सय्यद, संजय कोठारी, विकी सदाफुले, विकी घायतडक, सनी सदाफुले, बबन काशीद, विनायक राऊत, प्रा. लक्ष्मण ढेपे, वंचीतचे अतिष पारवे, सागर सदाफुले, मंगेश आजबे, दिगंबर चव्हाण व इतर १० ते १५ सदस्य हजर होते.
यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचना
१) मिरवणूक ही दिलेल्या वेळेत तसेच दिलेल्या मार्गप्रमाणे व कायदेशीर नियमात पार पाडावी.
२)वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
३)वाहतूक नियमन करिता आपले स्तरावर स्वयंसेवक नेमावे.
४)वादग्रस्त गाणी किंवा वादग्रस्त विधान कोणी करणार नाही व त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
५)मिरवणूक मार्गावरील मुस्लिम धार्मिकांचे प्रार्थनास्थळ ( मस्जिद ) या ठिकाणी मिरवणूक आल्यावर सदर ठिकाणावरून मिरवणूक पुढे न्यावी व नमाज च्या वेळेस कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणार नाही. याची दक्षता घ्यावी.
६)नगरपरिषद यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून घ्यावेत तसेच मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय करावी.
७)महावितरण कंपनीने जामखेड यांनी मिरवणूक मार्गावरील खाली आलेल्या विद्युत तारा ओढून घ्याव्यात.तसेच मिरवणूक चालू असताना लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
८)महिलांसाठी मिरवणूक मार्गावर किंवा कार्यक्रम ठिकाणी फिरते शौचालयाची व्यवस्था करावी.
No comments:
Post a Comment