पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २७ मार्च
भारतीय जनता पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व आ. प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खर्डा शहरातील १०० पेक्षा जास्त दलित युवकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काल दि. २६ मार्च रोजी ऐतिहासिक चोंडी नगरीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी सर्व तरूण कार्यकर्त्यांचे भाजपात उत्स्फूर्त स्वागत केले. या निमित्ताने जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप झाला असे मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र (दादा) यांच्या माध्यमातून व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सहकार्यातून खर्डा शहर व परिसरात मोठा विकास होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी काल प्रवेश घेतलेल्या तरूणांच्या रहिवासी वस्ती असलेल्या जागेचे भांडवल करून अतिक्रमणांच्या नावाखाली विरोधकांकडून येथील नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावून खर्डा येथील मागसवर्गीयांना बेघर होण्यापासून वाचवले होते. या कामावर प्रभावित होऊन खर्डा येथील १०० पेक्षा जास्त तरूणांनी रविंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते चौंडी याठिकाणी उस्फूर्तपणे भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून भाजपात प्रवेशाचे वारे जोरदार वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या प्रवेशामुळे खर्डा परिसरातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात होणार्या आगामी निवडणूकांमध्ये भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी खेळलेल्या खेळीला हे यश आले आहे. या खेळीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
चोंडी येथे झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी भाजपा कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्यासह
जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, युवक नेतृत्व लहु शिंदे, खर्डा ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील गोलेकर, वैजनाथ पाटील, गणेश शिंदे, महेश दिंडोरे, राजू मोरे, नानासाहेब गोपाळघरे,बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे, प्रशांत कांबळे, टिल्लू पंजाबी, मदन गोलेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काल दि. २६ रोजी भाजपा प्रवेश केलेल्या युवकांमध्ये विकास कांबळे, राकेश कांबळे, निखील पगारे, प्रकाश जावळे, अवि समुद्र, आदर्श जावळे, अभय बोराडे, योगेश जावळे, अक्षय जावळे, बालाजी समुद्र, सुमित जावळे, लखन पैठणपगार, पोपट पैठणपगार, परमेश्वर बोराडे, नितिन जावळे, अशोक जावळे, जितेंद्र पैठणपगार, शुभम पैठणपगार, प्रशांत गंगावणे, अवि पगारे, राहुल जावळे, प्रशांत कांबळे, नितिन विजय, कांबळे, संजय कांबळे, तेजस जावळे, प्रविण जावळे, किशोर जावळे, नितिन पैठणपगार, उदय जावळे, दिपक गायकवाड, प्रतिक जावळे, कपिल बोराडे, सुनिल बोराडे, राहुल सदाफुले, विशाल गवळी, सिधु पगारे, जितेंद्र जावळे, दिपक जावळे, लखन जावळे, राजु मोरे, किशोर जावळे, दादा जावळे, सचिन पैठणपगार, बाबा गायकवाड, सागर पैठणपगार, श्रीकांत कांबळे, उदय जावळे, शिवा जावळे, मंगेश जावळे, शहाजी पैठणपगार, , मुकेश पैठणपगार, मुकेश जावळे, मुकेश पैठणपगार, मुकेश जावळे, रोहित जावळे, विकास गवळी, आनंद साळवे, भिमा घोडेराव, मिलिंद साळवे, नवनाथ , जावळे, जीवन डाडर, विठ्ठल धनवे आदींसह अनेक तरूणांचा सामावेश आहे.
No comments:
Post a Comment