पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ मार्च
जामखेड तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच उषा छबुराव गायकवाड यांच्या विरुद्ध दाखल अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. दि. ८ मार्च रोजी विविध कारणे दाखवत ग्रामपंचायतच्या ७ सदस्यांनी दाखल केला होता प्रस्ताव. त्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी स्वत: जातेगाव येथे उपस्थित राहुन आज दि. १५ मार्च रोजी घेतलेल्या विशेष सभेत ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने, एक तटस्थ, तर स्वतः सरपंच यांनी ठरावाच्या विरोधात म्हणजे आपल्या स्वतःला एक मत घेतले. एकंदर पाहता हा अविश्वास ठराव ७ विरूध्द एक असा मंजूर झाल्याने सरपंच उषा गायकवाड यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
जातेगांव ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहेत. जानेवारी २०२१ रोजी झालेल्या निवडणुकी मध्ये विद्यमान उपसरपंच रविराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वयंभु केदारेश्वर ग्रामविकास पॅनलचे एकुण ९ पैकी ८ सदस्य निवडून आले होते. पैकी उषाबाई छबुराव गायकवाड यांची सरपंच पदावर निवड झाली होती.मात्र सरपंच उषाबाई गायकवाड या विकास कामे व इतर कामकाज करताना विश्वासात घेत नाहीत. सरपंचाचा मुलगा ग्रामपंचायत कामकाजात ढवळाढवळ करतो. शासनाचा निधी वेळेत खर्च होण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात. म्हणून सरपंच गायकवाड यांच्या विरुद्ध सात सदस्यांनी दि. ८ मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. १५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी उपस्थित सदस्यांना
अविश्वास ठराव संबंधी तरतुदी समजावून सांगितल्या. अविश्वास ठरावाच्या बाजूने ज्या सदस्यांना मतदान करावयाचे आहे. अशा सदस्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रविराज गायकवाड, सदस्य प्रवीण गायकवाड, रुक्मिणी वशिष्ठ गायकवाड, प्रयागा अंगद गायकवाड, आशालता गणेश गायकवाड, दिपाली पांडूरंग गर्जे, दिगंबर लेहना हराळ या सात सदस्यांनी हात वर करीत मतदान केले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार योगेश चंदे साहेब यांच्या , मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक कैलास जाधव, तलाठी वास्ते यांनी काम पाहिले. खर्डा पोलीस स्टेशनचे मस्के, वारे ,बडे ,यांनी चोख बंदोबस्त बजावला.
दरम्यान पुढील आदेश होईपर्यंत उपसरपंच रविराज गायकवाड यांच्याकडे सरपंचपदाचा कारभार असणार आहे.
No comments:
Post a Comment