पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १८ एप्रिल
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रा सचिन सर गायवळ निर्णायक ठरणार, ते काय भुमिका घेतात. याची जोरदार चर्चा होत असताना काल रात्री आ. राम शिंदे व प्रा. सचिन सर गायवळ यांच्यात रात्री उशीरापर्यंत झालेल्या राजकीय चर्चने ते आ. राम शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत लवकरच प्रा. सचिन सर गायवळ यांची राजकीय भुमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
जर आ. प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन सर गायवळ जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकत्र आल्यास बाजार समिती निवडणुकीत आ. रोहित पवार यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
प्रा. सचिन सर गायवळ यांना मानणारा मोठा वर्ग जामखेड तालुक्याच्या सक्रीय राजकारणात कार्यरत आहे. त्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रा. सचिन सर आणि प्रा आ राम शिंदेसाहेब एकत्र येऊन निवडणुक लढविल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर भारतीय जनता पार्टिच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
खर्डा परीसरात आणि संपुर्ण जामखेड तालुक्यातचं प्रा सचिन सर गायवळ यांचा प्रत्येक गावात युवा वर्गासोबत असलेला जनसंपर्क. त्यामध्ये अनेक सरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालकांचा समावेश आहे. ही येणा-या निवडणुकीत फायद्याची बाब ठरणार आहे
रात्री उशीरापर्यंत झालेल्या चर्चेनुसार प्रा. सचिन सर गायवळ यांनी कार्यकर्ते व समर्थकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितल आहे.
जामखेड तालुक्यात सध्याच्या राजकारणात स्थानिक नेत्यांमध्ये प्रा. सचिन सर गायवळ हे एकमेव असं नेतृत्व आहे की स्वबळावर तालुक्याच्या राजकारणात स्व:ताच अस्थित्व आहे, त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रा आ राम शिंदे साहेब आणि प्रा सचिन सर गायवळ या दोघांनी सोबत येऊन निवडणुक लढवली तर नक्कीच निवडणुक एकतर्फी होऊन स्थानिक निवडणुकांमध्येही या दोघांच नेतृत्व सिध्द होऊ शकते,
प्रा सचिन सर यांच्या एवढ्या राजकीय उंचीचा एकही नेता सध्याच्या राजकारणात जामखेड तालुक्यात नाही जे आहेत ते कोणाच्या तरी नेतृत्वात काम करत आहेत त्यामुळे स्वबळावर निवडणुकीचा निकाल बदलु शकतो असं स्व:ताच अस्तित्व असलेला दुसरा एकही नेता जामखेड तालुक्याच्या राजकारणात सध्या तरी नाही,
प्रा. सचिन सर गायवळ यांची समर्थकांसोबत चर्चा झाल्यानंतरच बाजार समिती निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत खरी रंगत येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रा. सचिन सर गायवळ यांची भुमिका निवडणुकीच्या निकालासाठी निर्णायक ठरू शकते असेही अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे त्यामुळे प्रा सचिन सर गायवळ निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment