पोलीस वारंट न्यूज नेटवर्क १५एप्रिल
काल दि. १४ एप्रिल रोजी जामखेड शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने जामखेड पोलीस स्टेशन येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळीउपस्थिती पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस नाईक अजय साठे, भिमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, वंचीतचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, संजय लोखंडे,भगीरथ देशमाने , प्रवीण पालवे, अजिनाथ जाधव, दिनेश गंगे आदींसह पोलीस कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment