पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ एप्रिल
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांनी दिलेल्या राज्य घटनेमुळे देशातील वंचित, दलित, शोषित घटकांबरोबरच सर्व समाज घटकांना समान न्याय व संधी मिळाली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आपला उद्धार नक्कीच होईल. हे कोणत्याही जोतिषाला सांगण्याची गरज नाही. तसेच आपल्या खर्ड्याच्या लढाईत अतुल्य असे शौर्य गाजवणाऱ्या मराठी सरदार शिदनाक नाईक यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचे खर्डा या भुमीत भव्य स्मारक उभारण्यात यावे असे प्रतिपादन त्यांनी केले
छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बिपिनचंद्र लाड, संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे, निलेश आहेर, भीमा घोडेराव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार प्राप्त डॉ. महेश गोलेकर यांच्याकडून सिताराम जावळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवानंद जाधव
No comments:
Post a Comment